माझी कन्या भाग्यश्री योजना | Mazi kanya Bhagyashri Yojna-2024

Health Care in Winter 17 1

माझी कन्या भाग्यश्री योजना देशातील मुलींचे प्रमाण सुधारण्यासाठी व स्त्री शिक्षणाला चालना देण्यासाठी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र सरकारने 1 एप्रिल 2016 रोजी Mazi kanya Bhagyashri Yojna-2024 ही योजना सुरू केली आणि या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक प्रत्येक मुलीच्या आई किंवा वडिलांनी मुलीच्या जन्मानंतर एक वर्षाच्या आत नसबंदी करून घेतली तर रुपये 50,000/ ची रक्कम राज्य सरकार त्या आई-वडिलांच्या मुलीच्या नावावर बँकेत जमा करेल.

माझी कन्या भाग्यश्री योजना | Mazi kanya Bhagyashri Yojna-2024

Mazi kanya Bhagyashri Yojna-2024 या योजनेमध्ये जर आई-वडिलांनी दुसऱ्या मुलीला जन्म दिल्यानंतर कुटुंब नियोजन करिता जर नसबंदी केली असेल, तर नसबंदीनंतर दोन्ही मुलींच्या नावे प्रत्येकी 25 हजार रुपये बँकेत जमा केले जाणार आहेत. जेणेकरून त्या मुलींच्या पुढील काळात ही रक्कम त्यांच्या शिक्षणासाठी वापरता येईल.

माझी कन्या भाग्यश्री या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील एका व्यक्तीच्या फक्त दोनच मुलींना या योजनेचा लाभ होणार आहे. Mazi kanya Bhagyashri Yojna-2024 च्या अंतर्गत, मुलीच्या जन्मानंतर एका वर्षाच्या आत पालकांना नसबंदी करावी लागेल आणि दुसरी मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्या जन्मापासून सहा महिन्यांच्या आत नसबंदी करणे बंधनकारक असेल. या योजनेमध्ये पूर्वी दारिद्र रेषेखालील कुटुंबे(BPLधारक) आणि ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयापर्यंत होते असे नागरिक या Mazi kanya Bhagyashri Yojna-2024 योजनेसाठी पात्र होते.

परंतु या योजनेच्या नवीन धोरणानुसार Mazi kanya Bhagyashri Yojna-2024 योजनेमध्ये मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांवरून 7.5 (साडेसात) रुपये करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ज्या कुटुंबाचे वर्षी उत्पन्न 7.5 म्हणजेच साडेसात लाख रुपये आहे तेही नागरिक या योजनेसाठी पात्र असणार आहेत.

Health Care in Winter POINT DOWN1

सुधारित माझी कन्या भाग्यश्री योजनेचा अधिकृत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

माझी कन्या भाग्यश्री योजनेचे तपशील | Details of Mazi kanya Bhagyashri Yojna-2024

योजनेचे नावमाझी कन्या भाग्यश्री योजना
कोणाद्वारे सुरू केलीमहाराष्ट्र राज्यसरकार
योजना सुरु करण्याची तारीख1 एप्रिल 2016
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील मुली
उद्दिष्टमहाराष्ट्रातील मुलींचे शिक्षण व जीवन सन्मान उंचावणे

माझी कन्या भाग्यश्री योजनेचे उद्दिष्ट| Objective of Mazi kanya Bhagyashri Yojna-2024

आपल्या समाजात मुलींना वजन आणणारे व मुलींची भ्रूणहत्या करणारे तसेच मुलींना त्यांच्या शिक्षणापासून वंचित ठेवणारे अनेक लोक आहेत, या सर्व समस्या लक्षात घेऊन आपल्या राज्य सरकारने ही महाराष्ट्र माझी भाग्यश्री कन्या योजना 2024 सुरू केली आहे. महाराष्ट्रातील मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या जीवन सन्मानाच्या सुरक्षेबद्दल खात्री देणे, लिंग निर्धारण आणि स्त्रीभ्रूणहत्या थांबवणे, सर्व महिला व मुलींना समान दर्जा व त्यांच्या शैक्षणिक प्रोत्साहणाकरिता समाजात कायमस्वरूपी सामूहिक वातावरण निर्माण करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

Mazi Kanya Bhagyashri Yojana-2024 योजनेच्या माध्यमातून मुलींना उच्च व उत्तम शिक्षणाकडे प्रोत्साहन देणे आणि राज्यातील मुलींबद्दल नकारात्मक विचारसरणी बदलणे, तसेच या योजनेद्वारे मुलींचे भविष्य उज्वल करणे, गाव,तालुका,जिल्हा, व निम्मस्तरावर विविध संस्था व सेवा देणारे यांचा समन्वय घडवून आणणे हे या माझी कन्या भाग्यश्री या योजनेचे उद्दिष्ट आहे.

Mazi kanya Bhagyashri Yojna-2024 | Terms & Conditions
माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या अटी

माझी कन्या भाग्यश्री या योजनेचा समावेश सुकन्या योजनेच्या अंतर्गत होतो त्यामुळे सुकन्या योजनेच्या सर्व अटी Mazi Kanya Bhagyashri Yojana-2024 या योजनेमध्ये लागू करण्यात आले आहेत. तसेच सुकन्या योजनेमध्ये ज्या मुली आहेत त्या मुली “माझी कन्या भाग्यश्री” या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.

  • ‘माझी कन्या भाग्यश्री'(Mazi Kanya Bhagyashri Yojana-2024) योजना सर्व गटातील दारिद्रय रेषेखालील (BPL) तसेच दारिद्रय रेषेच्यावरील (APL) (पांढरे रेशनकार्डधारक) कुटुंबात जन्मलेल्या अपत्यांपैकी दोन मुलींना लागू असेल.
  • माझी कन्या भाग्यश्री या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वडील महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • Mazi Kanya Bhagyashri Yojana-2024 या योजनेचा लाभ घेण्यासाठी पालकांना अर्ज करतेवेळी मुलीचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • विम्याचा लाभ घेते वेळी मुलींचे वय 18 वर्ष पूर्ण होणे आवश्यक आहे. तसेच ती मुलगी इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण होणे व 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत अविवाहित असणे अनिवार्य आहे.
  • पालकांना जर दुसऱ्या प्रसूतीच्या वेळेस जुळ्या (Twince) मुली झाल्या तर सदरील दोन्ही मुलींना प्रकार दोन प्रमाणे योजनेचा लाभ मिळेल.
Health Care in Winter 18 1
  • जर एखाद्या कुटुंबाने एका अनाथ मुलीस दत्तक घेतले असेल तर त्या मुलीला त्यांची प्रथम मुलगी मानून या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. परंतु हा लांब प्राप्त होण्यासाठी दत्तक मुलीचे वय 0 ते 6 (6 किंवा 6 वर्षापेक्षा कमी) असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ बालगृहातील अनाथ मुलींसाठी सुद्धा आहे.
  • प्रकार-1 च्या लाभार्थी कुटुंबास एका मुलीनंतर व प्रकार-2 च्या लावरती कुटुंबास दोन अपत्याच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे बंधनकारक असेल.
  • सदर योजनेअंतर्गत 18 वर्षानंतर LIC कडून जे रुपये 1,00,000/- मिळणार आहेत त्यापैकी किमान रुपये 10,0000/- मुलींच्या कौशल्य विकासावर खर्च करणे बंधनकारक आहे जेणेकरून संबंधित मुलीला एक चांगला रोजगार मिळून कायमस्वरूपी उत्पन्न मिळेल.
  • सदर (Mazi kanya Bhagyashri Yojna-2024) ही योजना आधार कार्ड सोबत जोडण्यात येईल.
  • विहित दिलेल्या मुदतीपूर्वी म्हणजे मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी मुलीचा विवाह अथवा मृत्यू झाल्यास, या योजनेचा लाभ तिच्या पालकांना होणार नसून, मुलीच्या नावे बँक खात्यात जमा असणारी रक्कम महाराष्ट्र शासनाच्या नावाने असणाऱ्या Surplus या अकाउंट मध्ये जमा केली जाईल.

माझी कन्या भाग्यश्री योजनेचे स्वरूप | Mazi kanya Bhagyashri Yojna-2024 Structure

प्रकार-1 चे लाभार्थी महाराष्ट्रातील ज्या आई-वडिलांना एकुलती एक मुलगी आहे व तिच्या मातेने कुटुंब नियोजन केले आहे.
प्रकार-2 चे लाभार्थी एक मुलगी आहे आणि तिच्या मातेने दुसऱ्या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली आहे. अशा परिस्थितीत दोन्ही मुलींना प्रकार-2 चे लाभ दिले जातील. मात्र एक मुलगा व एक मुलगी असल्यास त्या पालकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
Health Care in Winter 19 1

माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी लागणारी आवश्यक्य कागदपत्रे . | Mazi kanya Bhagyashri Yojna-2024 Documents

  • मुलीच्या पालकाचे महाराष्ट्रातील रहिवासी अधिकृत प्रमाणपत्र
  • मुलीचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र
  • एक किंवा दोन मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • BPL श्रेणी रेशन कार्ड
  • मिळकत प्रमाणपत्र
  • अर्जदाराचा मोबाईल नंबर
  • मुलीचे व मुलीचे आईचे बँक पासबुक
  • पासपोर्ट साईज फोटो

अर्ज कसा करायचा | How to Apply Mazi kanya Bhagyashri Yojna-2024

माझी कन्या भाग्यश्री (Mazi kanya Bhagyashri Yojna-2024)या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बालविकास प्रकल्प अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी(बाल कल्याण), जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, विभागीय उपायुक्त (महिला बाल विकास) यांच्या कार्यालयात विनामूल्य अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आपण तिथे जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता.

याशिवाय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट Official website वर जाऊन देखील तुम्ही माझी कन्या भाग्यश्री Mazi kanya Bhagyashri Yojna-2024 या योजनेचा एप्लीकेशन फॉर्म [Application Form] डाऊनलोड करू शकता

माझी कन्या भाग्यश्री योजनेचे फायदे. | Benefits of Mazi kanya Bhagyashri Yojna-2024

  • मुलीच्या नावावर महाराष्ट्र शासना मार्फत LIC कडे रुपये 21,000/- चा विमा उतरण्यात येईल. तसेच मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 1 लाख रुपयांचा विमा देण्यात येईल.
  • मुलगी पाच वर्षाची होईपर्यंत प्रत्येक वर्षाच्या शेवटी 2,000/- प्रतिवर्षाप्रमाणे एकूण 10,000/- रुपये देण्यात येतील.
  • तसेच त्यांना प्राथमिक शाळा व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणासाठीही महाराष्ट्र सरकार आर्थिक मदत करणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला अधिकृत कार्यालयात किंवा या योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती मिळेल.

FAQ

1. या योजनेचा उद्देश काय आहे?

या योजनेचा उद्देश राज्यातील मुलींचे शिक्षण आणि कल्याणासाठी आर्थिक मदत देणे हा आहे. या योजनेद्वारे, मुलींचे पालक त्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी पैसे जमा करू शकतात आणि सरकार त्या रकमेवर व्याज देईल.

2. या योजनेसाठी पात्रता काय आहे?

  • मुलगी महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • मुलीचे वय 1 वर्ष ते 10 वर्षे यांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • मुलीचे नाव जन्म नोंदणी प्रमाणपत्रात नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
  • मुलीचे पालक महाराष्ट्राचे कायमचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • मुलीच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ₹1.5 लाखांपेक्षा जास्त नसावे.

3. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय अर्ज करण्याची प्रक्रिया आहे?

  • मुलीच्या पालकांनी महिला आणि बाल विकास विभागाच्या वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे.
  • अर्जांची छाननी महिला आणि बाल विकास विभागाद्वारे केली जाईल.
  • पात्र अर्जदारांना निवडून त्यांना योजनेचा लाभ दिला जाईल.

4. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय कागदपत्रे आवश्यक आहेत?

  • आधार कार्ड
  • ७/१२ उतारा
  • बँक खाते पासबुक
  • जन्म नोंदणी प्रमाणपत्र
  • पालकांचे निवासस्थानाचा पुरावा
  • पालकांच्या उत्पन्नाचा पुरावा

5. या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम किती आहे?

या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम मुलीच्या वयानुसार बदलते.

  • 1 वर्षापासून 5 वर्षे पर्यंत: ₹1 लाख
  • 6 वर्षापासून 10 वर्षे पर्यंत: ₹50,000

याव्यतिरिक्त, तुम्हाला या योजनेशी संबंधित अधिक माहितीसाठी महिला आणि बाल विकास विभागाच्या वेबसाइटला भेट देऊ शकता किंवा आपल्या जवळील महिला आणि बाल विकास कार्यालयाशी संपर्क साधू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *