AGI Technology आणि AI मधील फरक सध्या जगभरात कृत्रिम बुद्धीमत्तेची म्हणजे Artificial intelligence (AI) ची जोरदार चर्चा सुरू आहे. दिवसेंदिवस त्यामध्ये नवनव्या सुधारणा होत आहेत ते दिसून येत आहे. Open AI ओपन एआय कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी आर्टिफिशियल जनरल इंटेलिजेन्स (AGI) च्या विकासासाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करन्यासाठी ते तयार झाले आहेत. ते “The wall street journal(‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ ) ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. सध्या अस्तित्वात असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजे Artificial intelligence (AI) अत्युच्च विकास म्हणून AGI (एजीआय) कडे पाहिले जात आहे. दुसरीकडे तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक जागतिक कंपन्यांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
एआय आणि एजीआयमध्ये काय फरक आहे ?
- AGI Technology आणि AI मधील काय फरक आहे ? एआय (AI) आणि एजीआय (AGI) यामध्ये नक्कीच फरक आहे. मुख्य फरक आहे, तो म्हनजे व्याप्ती आणि क्षमतेचा! एआय एखादी विशिष्ट कृती करण्यासाठी तुम्हाला मदत करू शकेल. उदाहरणार्थ– चित्र ओळखणे, त्यावर प्रक्रिया करणे, भाषांतर करून देणे किंवा तुमच्याबरोबर बुद्धिबळासारखा खेळ खेळणे.
- एआयकडून ही सगळी कामे मानवापेक्षा जलद आणि अचूक गतीने केली जात असली तरीही त्याची क्षमता तेवढ्या एखाद्या कृतिपूरतीच मर्यादित असते .
- दुसऱ्या बाजूला एजीआय एखाद्या कृतीपुरते मर्यादित नाही. त्याची क्षमता आणि व्याप्ती एआयपेक्षा अधिक मोठी असणार आहे. ते अगदी मानवी बुद्धिमत्तेप्रमाणे (Human Brain) अचूकपणे एकाच वेळी अनेक कामे करू शकेल. त्यामुळेच एजीआय (AGI) बाबतच्या घडामोडींकडे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासाचे अत्युच्च शिखर म्हणून पाहिले जात आहे.
- संशोधक तज्ञांकडून एआयच्या क्षमतांमध्ये वाढ करण्याचे प्रयत्न आधीपासूनच केले जात आहेत. म्हणुनच नोव्हेंबर २०२२ मध्ये चॅटजीपीटी (Chat GPT) सारखे एआय माध्यम Market मध्ये आल्याबरोबर अल्पावधीतच इतके लोकप्रिय झाल्याचे दिसून आले.
- तो अगदी मानवी बुद्धिमत्तेप्रमाणेच मजकुरावर प्रक्रिया करू शकते, हेच त्यामागचे कारण आहे. तेव्हापासून एआय (AI) हा विषय अधिक प्रमाणात चर्चेला आला. सध्या त्यामधील संशोधनाला अधिकाधिक गती देण्यासाठी अब्जावधी डॉलर्स खर्च केले जात असल्यामुळे आता दिवसेंदिवस एआयची माध्यमे अधिकाधि विकसित होत आहेत. एजीआय हे याच एआय विकासाचे अत्युच्च शिखर ठरेल, यात शंका काही नाही.
ही पूर्णपणे नवी कल्पना आहे का ?
- तर नाही. ही पूर्णपणे नवी कल्पना आहे, असे म्हनुन चालणार येणार नाही. २० व्या शतकामध्ये पहिल्यांदा एजीआयची संकल्पना मांडण्यात आली होती. कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक मानल्या जाणाऱ्या ॲलन ट्युरिंग यांनी आपल्या शोधनिबंधामध्ये सर्वप्रथम ही कल्पना मांडली होती.
- त्यांनी ‘कॉम्प्युटिंग मशिनरी & इंटेलिजेन्स’ (१९५०) या शोधनिबंधामध्ये यंत्रांची बुद्धिमत्ता मोजण्यासाठी ‘ट्युरिंग टेस्ट'(TURING TEST) नावाची नवी संकल्पना मांडली होती. ट्युरिंग टेस्टनुसार एखादे मशीन जर माणसाबरोबर हुबेहूब माणसाप्रमाणेच संवाद साधू शकत असेल, तर ते मानवी बुद्धिमत्तेचेच प्रदर्शन करीत असल्याचे द्योतक आहे, असे सांगण्यात आले होते.
- ट्युरिंग यांनी हा शोधनिबंध (Research) लिहिला तेव्हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास अजिबात झालेला नव्हता. इतकेच काय, संगणक सुद्धा त्याच्या प्राथमिक अवस्थेत होता.
- पण, ट्युरिंग यांनी ही संकल्पना मांडल्यामुळे अशा प्रकारच्या यंत्रांच्या अस्तित्वाबाबतच्या चर्चांना सुरुवात झाली होती. मानवी बुद्धिमत्तेची क्षमता असणाऱ्या अशा यंत्रांच्या फायद्या-तोट्यांवरही चर्चा होत होत्या.
एजीआय (AGI) चा मानवासाठी काय फायदा होऊ शकतो ?
- सैद्धांतिकदृष्ट्या (AGI) एजीआयचे अनेक सकारात्मक फायदे सांगता येऊ शकतात.
- उदाहरणार्थ- आरोग्याच्या क्षेत्रामध्ये एजीआयचा वापर केल्यास कमी कालावधीमध्ये अचूक पद्धतीने रोगाचे निदान, उपचाराची पद्धती आणि रुग्णपरत्वे औषधोपचारही निश्चित करता येऊ शकतो.
- इतक्या मोठ्या प्रमाणामद्धे असलेल्या माहितीच्या विस्तृत साठ्याचे कमी कालावधीत विश्लेषण करून निर्णय घेणे ही मानवी बुद्धिमत्तेच्या पलीकडे जाणारी गोष्ट आहे. मात्र, एजीआयमुळे हे वास्तवात येऊ शकते.
- अगदी अर्थकारणात आणि व्यवसाय (Finance & Business) मध्येही एजीआयचा वापर प्रभावीपणे केला जाऊ शकतो. एजीआयद्वारे सद्यःस्थितीतील मार्केट चे अचूक विश्लेषण करून अंदाज वर्तविण्याचे कामही सहजतेने होऊ शकते.
- शिक्षण क्षेत्राचे उदाहरण घेतल्यास, एजीआयमुळे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अनोख्या गरजा पूर्ण करता येऊ शकतात. प्रत्येकाची क्षमता ओळखून, त्याच्या क्षमतेप्रमाणे त्याला शिक्षण देण्याची व्यवस्था अस्तित्वात आणता येऊ शकते.
भीतीचे व संशयाचे वातावरण आहे का ?
- एकीकडे एजीआय (AGI Technology)चे इतके फायदे सांगितले जात असताना दुसरीकडे मात्र त्याबाबत भीतीही व्यक्त केली जात आहे. एजीआय (AGI) प्रणाली विकसित करण्यासाठी होणारा उर्जेचा वापर आणि ई-कचऱ्याच्या निर्मितीमुळे पर्यावरणावर होणारा परिणाम हा चिंतेता विषय आहे.
- एजीआयमुळे रोजगारामध्येही मोठ्या प्रमाणावर घट होण्याची शक्यता आहे; तसेच सामाजिक आणि आर्थिक विषमतेमध्येही प्रचंड वाढ होऊ शकते, असे म्हटले जात आहे.
- दुसरीकडे ज्यांच्या हातात एजीआयचे नियंत्रण (Control) असेल त्यांच्या हातात इतरांपेक्षा अधिक अधिकार येऊ शकतात. असे झाल्यास, त्यामुळे नव्या प्रकारच्या समस्या आणि व्यवस्था उदयाला येण्याची शक्यता आहे; ज्याची आपण कल्पनाही केलेली नाही.
- जर मनुष्य एजीआय तंत्रज्ञानावर अधिकाधिक अवलंबून राहू लागला, तर तो आपल्या मूलभूत मानवी क्षमता आणि कौशल्येही गमावून बसण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. एजीआय (AGI) मानवी क्षमतेला ओलांडून त्याच्याही पुढे जाऊ शकतो, हाच एजीआयबाबतचा सर्वांत मोठा धोका आहे. असे झाल्यास, मानवाला एजीआयच्या संभाव्य कृती (Possible Action) समजून घेणे आणि त्यांचा अंदाज वर्तविणेही कठीण होऊ शकते.
- अनेक साय-फाय चित्रपटांमध्ये मानवाचे यंत्रमानवांवरील नियंत्रण सुटून, ते अधिक शक्तिशाली झाल्याचे चित्रण केलेले दिसून येत आहे. अनेक चित्रपटांमध्ये असे यंत्रमानव मानवी कल्याणाच्या विरोधात जाताना दिसतात. अगदी तसेच काहीसे येणाऱ्या भविष्यातील वास्तवात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- बीबीसीला २०१४ (BBC News) मध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये दिवंगत प्राध्यापक स्टीफन हॉकिंग म्हणाले होते की, “कृत्रिम बुद्धिमत्तेचा संपूर्ण विकास झाला, तर मानवजातीचा अंतही होऊ शकतो.” त्यामुळेच एजीआय (AGI) चा विकास हा मानवी मूल्यांशी सुसंगत आणि मानवाच्या सुरक्षिततेला व विकासाला धरूनच व्हायला हवा. त्यासाठी अनेक विचारवंत मांडणी करताना दिसून येत आहेत.
एजीआय (AGI) म्हणजे काय ?
- एजीआयमुळे एखाद्या मनुष्याला करता येईल असे कोणतेही काम मशीन किंवा सॉफ्टवेअरलाही करता येईल. त्यामध्ये तर्कवितर्क, सामान्य ज्ञान, कार्यकारणभाव इत्यादी मानवी कौशल्यांचा समावेश असणार आहे .
- अगदीच सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर, एजीआय (AGI) मुळे मशीनलासुद्धा मानवी बुद्धीप्रमाणेच काम करता येईल. मशीनसुद्धा माहीत नसलेल्या गोष्टी नव्याने शिकणे, नव्या अनुभवांमधून शिकणे आणि प्राप्त केलेली माहिती वापरात आणण्यासारख्या अनेक गोष्टी माणसाप्रमाणे शिकू शकेल.
- मनुष्य त्याच्या अनुभवांमधून विविध प्रकारच्या गोष्टी शिकतो. घर, शाळा अशा इतर ठिकाणांमधून त्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. एखाद्या गोष्टीचे निरीक्षण करून वा लोकांशी संवाद साधून वा पुस्तके, टीव्ही(TV) अशा माध्यमांतूनही त्याची जडणघडण होते आणि त्याच्या मेंदूचा विकास होतो. त्यानंतर मानवाचा मेंदू विविध अडचणींवर मात करून मार्ग काढण्यासाठी या सगळ्या अनुभवांतून प्राप्त झालेल्या माहितीचा वापर करतो.
- एजीआय (AGI) मुळे एखादे सॉफ्टवेअर (Software) अथवा मशीनदेखील अगदी हीच क्षमता प्राप्त करू शकेल. कृत्रिम बुद्धिमत्तेचा एवढा विकास प्रत्यक्षात आणण्याचे संशोधनकारचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे मानवी मेंदू ज्याप्रमाणे काम करतो अगदी तसेच काम एजीआयमुळे मशीनलाही करता येऊ शकेल, या दृष्टीने संशोधक काम करत आहेत.
AGI Technology FAQ:
1) एजीआय केव्हा शक्य होईल?
उत्तर: AGI चा नेमका वेळ निश्चित नाही. सध्या संशोधन सुरु असून अनेक आव्हान आहेत.
2) एजीआय आपल्यासाठी फायदेशीर ठरेल का?
उत्तर: AGI चा आपल्यावर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम होऊ शकतात. ते आपल्या जीवनमान उंचावण्यास आणि जटिल समस्या सोडवण्यास मदत करू शकते, परंतु त्याचा गैरवापर होण्याची देखील शक्यता आहे.
3) एजीआय नोकरीची जागा घेईल का?
उत्तर: AGI काही नोकऱ्यांची जागा घेऊ शकते, परंतु नवीन संधी देखील निर्माण करू शकते. एजीआय शी सहकार्य करून आपण अधिक कार्यक्षम बनू शकतो.
4) एजीआयच्या विकासाचा आपण कसा प्रतिसाद द्यावा?
उत्तर: एजीआयच्या जबाबदार विकासासाठी आपण धोरणांवर प्रभाव पाडू शकतो आणि या तंत्रज्ञानाचा वापर नैतिकतेनुसार केला जाईल याची खात्री करू शकतो.