Job in Sate Bank of India-2024 | एसबीआय मधे नोकरीची संधी

Health Care in Winter 1 1 1

प्रस्तावना | Introduction:

Job in Sate Bank of India-2024 स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने 2024 साठी विशेषज्ञ अधिकारी (Specialist Cadre Officers – SCO) पदांसाठी एकूण 1511 जागांची भरती प्रक्रिया जाहीर केली आहे.

भारतातील अनेक शाखांमध्ये विविध विभागांतर्गत तांत्रिक आणि व्यवस्थापकीय पदांसाठी ही भरती होणार आहे.

तंत्रज्ञान (Technical), नेटवर्किंग(Networking), प्रकल्प व्यवस्थापन(Project Manger), आणि माहिती सुरक्षेत करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.

अर्ज करण्यासाठी उमेदवारांना SBI च्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता आहे.

भरतीची महत्त्वाची वैशिष्ट्ये | Important Features:

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) 2024 साठी विशेषज्ञ अधिकारी (Specialist Cadre Officers – SCO) भरतीसाठी एकूण 1511 पदे जाहीर केली आहेत.

भरतीसाठी उमेदवारांना 14 सप्टेंबर 2024 पासून 4 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी फक्त अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करावा आणि शेवटच्या तारखेपूर्वी फी भरावी.

भरतीमध्ये विविध विभागांतर्गत पदांसाठी जागा उपलब्ध आहेत, ज से की तंत्रज्ञान, प्रकल्प व्यवस्थापन, नेटवर्किंग ऑपरेशन्स, इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट (Infrastructure support)आणि माहिती सुरक्षा इत्यादी.

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व पात्रता अटी वाचाव्यात आणि त्यानुसार अर्ज करावा. अर्ज पूर्ण करण्यासाठी एक वैध ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर आवश्यक आहे.

Health Care in Winter 3 1

प्रमुख पदे | Main Post:

SBI च्या भरतीमध्ये तांत्रिक व व्यवस्थापकीय पदांसाठी जागा जाहीर केल्या आहेत. काही प्रमुख पदे खाली दिली आहेत:

  1. Deputy Manager (Systems) – Project Management & Delivery
  1. एकूण 187 जागा
  2. मुख्यत: सॉफ्टवेअर प्रकल्प व्यवस्थापन आणि वितरणाशी संबंधित कामे.
  3. Deputy Manager (Systems) – Infra Support & Cloud Operations
  1. एकूण 412 जागा
  2. IT इंफ्रास्ट्रक्चर आणि क्लाउड ऑपरेशन्सचे व्यवस्थापन.
  3. Deputy Manager (Systems) – Networking Operations
  1. एकूण 80 जागा
  2. नेटवर्किंग ऑपरेशन्सचे व्यवस्थापन व नेटवर्क सुरक्षा.
  3. Assistant Manager (Systems)
  1. एकूण 784 जागा
  2. IT आणि सिस्टीम व्यवस्थापनाशी संबंधित विविध जबाबदाऱ्या.

पात्रता | Elegibility Criteria:

प्रत्येक पदासाठी वेगवेगळे शैक्षणिक व व्यावसायिक निकष ठरवण्यात आले आहेत. खालीलप्रमाणे प्रमुख पात्रता निकष दिले आहेत:

  • शैक्षणिक पात्रता:
  • Deputy Manager (Systems): B.E./B.Tech संगणक विज्ञान, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी मध्ये किमान 50% गुण आवश्यक. MCA किंवा समकक्ष पदवीधरही अर्ज करू शकतात.
  • Assistant Manager (Systems): B.E./B.Tech संगणक विज्ञान, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स किंवा समकक्ष पदवी आवश्यक. संबंधित क्षेत्रातील अनुभव किंवा तांत्रिक प्रमाणपत्र धारक उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
  • वयोमर्यादा:
  • Deputy Manager पदांसाठी: 25 ते 35 वर्षे
  • Assistant Manager पदांसाठी: 21 ते 30 वर्षे
  • अनुभव:
  • काही पदांसाठी संबंधित क्षेत्रात किमान 4 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. उदा. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, नेटवर्किंग, क्लाउड ऑपरेशन्स यामध्ये अनुभव असणारे उमेदवार प्राधान्यक्रमात येतील.

अर्ज कसा करावा ? | How to apply ? :

SBI च्या या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. अर्ज करण्यासाठी खालील चरणांचे पालन करावे:

  1. अधिकृत वेबसाइट:
    उमेदवारांनी SBI च्या अधिकृत वेबसाइटवर https://bank.sbi/web/careers/current-openings या लिंकवर जाऊन अर्ज करावा.
  2. नोंदणी:
    उमेदवारांनी प्रथम स्वत: ची नोंदणी करावी. नोंदणी करताना वैध ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर देणे आवश्यक आहे.
  3. कागदपत्रे अपलोड:
    अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आपले फोटो, स्वाक्षरी, आणि शैक्षणिक प्रमाणपत्रे (PDF फॉर्मॅटमध्ये) अपलोड करणे आवश्यक आहे. फाइल्सचे आकार ठरवलेल्या निकषानुसार असावे.
  4. फी भरणे:
    अर्ज सादर केल्यानंतर उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्जाची फी भरावी. जनरल/ओबीसी श्रेणीसाठी अर्ज फी 750 रुपये आहे, तर SC/ST आणि PwBD श्रेणीसाठी अर्ज शुल्क नाही.
  5. प्रिंटआउट:
    अर्ज सादर केल्यानंतर त्याची प्रिंट काढून ठेवणे आवश्यक आहे.
Health Care in Winter 2 1

कशी आहे निवड प्रक्रिया? | How is selection process?

निवड प्रक्रिया दोन प्रमुख टप्प्यांमध्ये होईल:

  1. ऑनलाइन लेखी परीक्षा:
    सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी ऑनलाइन लेखी परीक्षा होईल. परीक्षेमध्ये सामान्य योग्यता आणि व्यावसायिक ज्ञान या विषयांवर आधारित प्रश्न असतील. व्यावसायिक ज्ञानाच्या पेपरमध्ये IT संबंधित प्रश्न विचारले जातील.
  2. संवाद सत्र:
    डेप्युटी मॅनेजर पदांसाठी थेट संवाद सत्र होईल, ज्यामध्ये तांत्रिक कौशल्ये, व्यवस्थापन कौशल्ये, आणि अनुभवावर आधारित उमेदवारांची तपासणी होईल. संवाद सत्रात मिळालेल्या गुणांच्या आधारावर गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
  • लेखी परीक्षा (केवळ Assistant Manager पदासाठी):
    • परीक्षेमध्ये गणितीय क्षमता, तार्किक क्षमता, आणि इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व यावर आधारित प्रश्न विचारले जातील.
    • या सोबतच व्यावसायिक ज्ञान (IT संबंधित) पेपर असेल. परीक्षेत कोणत्याही चुकीच्या उत्तरांसाठी निगेटिव्ह मार्किंग नाही.
  • संवाद सत्र (Deputy Manager पदांसाठी):
    निवडलेल्या उमेदवारांसोबत संवाद सत्र आयोजित केले जाईल, ज्यामध्ये 100 गुणांची परीक्षा घेतली जाईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 ऑक्टोबर 2024

अधिकृत जाहिरात – येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज – इथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *